गोल पोस्ट क्रीडा टेनिस सेरेना पुन्हा एकदा अव्वल

सेरेना पुन्हा एकदा अव्वल

अमेरिका, ८ सप्टेंबर २०२०: अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत विजय मिळवत प्रतिस्पर्धी स्लोनी स्टिफनचा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला.
तिने तिसऱ्या फेरीच्या या सामन्यात स्टिफनचा 2-6, 6-2, 6-2 असा पराभव केला. या सामन्यात प्रथमच सेरेनाला पहिला सेट गमवावा लागला होता. त्यानंतर मात्र, तिने आपला अनुभव पणाला लावून खेळ केला.
तिच्या आक्रमकतेपुढे स्टिफन निरुत्तर झाली होती. तिला सेरेनाची सर्व्हिसही अनेकदा भेदता आली नाही. या निमित्ताने तीने आपले खेळातील वर्चस्व पुन्हा एकदा दाखून दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version