गोल पोस्ट महाराष्ट्र पुरंदर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश

पुरंदर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश

पुरंदर,पुणे २८ जानेवारी २०२४ : सध्या पुरंदर तालुक्यातून अनेक कार्यकर्ते भाजप पक्षात प्रवेश करत असून काही इच्छुकही येत्या महिन्यात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करणार असल्याचे चित्र भाजपाचे पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्या निवास स्थानी दिसून आले आहे. जेजुरीच्या खंडोबा गडावरील घडशी, गुरव, कोळी समाजाच्या काही तरुणांनी बाबाराजे जाधवराव, कार्यकारणी सदस्य सचिन पेशवे, निलेश जगताप, गिरीश जगताप, कोल्हापूर प्रभारी अलका शिंदे, तालुका अध्यक्ष गणेश भोसले, जेजुरी अध्यक्ष महेश राऊत यांच्या उपस्थितीत पुरंदर भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गडकिल्ला म्हणून पुरंदर कडे पहिले जात होते, परंतु अल्पशा काळातच भाजपा पक्ष कार्यकर्त्यांनी आपली कंबर कसुन काम केलं आणि पुरंदर मध्ये भगवे वादळ घोंगाऊ लागले आहे. त्यातच अयोध्यातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा या प्रभावी घटनांमुळे परिसरातून तरुण वर्ग भाजपाची वाट धरू पहात आहे. यावेळी भाजपाचे जेजुरी शहर चिटणीस विक्रम माळवदकर, महिलाध्यक्षा उमा कुंटे, मंगल पवार यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!
Exit mobile version