गोल पोस्ट इतर राजकारण शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा औरंगाबाद मध्ये एकाच गाडीतून...

शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा औरंगाबाद मध्ये एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधान

औरंगाबाद, ९ ऑक्टोबर २०२२ : एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवले आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठा भूकंप आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे औरंगाबाद मध्ये एकाच गाडीतून प्रवास करताना पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा आहेत. औरंगाबादमध्ये आल्यावर शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांची शहरात भेट झाली. त्यानंतर शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीतुन प्रवास केला. वेळोवेळी राष्ट्रवादी पक्षावर कुठलीही टीकेची संधी न सोडणारे रावसाहेब दानवे आणि शरद पवार एकाच गाडीतुन प्रवास करताना पाहून राजकीय चर्चांना उधाण आले.

दरम्यान औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे.

शिवसेना कधीही संपणार नाही, ती आणखी जोमाने वाढेल. शिवसेनेमध्ये जी तरुणपिढी आहे, ती अजून जोमाने काम करणारी आहे. निवडणुकींना सामोरे जायचे असेल आणि एखादी संघटना असेल त्यावेळी चिन्ह असो किंवा नसो तरीही निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दाखवली पाहिजे असा सल्लाही शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला.

शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठवले याचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हा निर्णय होईल याची मला खात्री होती. अगदी निर्णय कोण घेणार याविषयी माहिती नव्हती. निर्णय गुजरातमधून घेतले जातील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे जे काही घडायचे ते घडले आहे असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version