गोल पोस्ट इतर राजकारण शरद पवार केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी बाजू मांडणार

शरद पवार केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी बाजू मांडणार

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ : निवडणूक चिन्हाबाबत समन्स आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगापूढे आपली बाजू मांडणार आहेत. यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्या सोबत असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे.

पक्षाचे नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावरही त्यांनी अधिकार सांगितला आहे. दोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या दावे प्रतिदाव्यांवर म्हणणे ऐकून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने शरद पवार यांना पाठविलेल्या समन्सनुसार ते आपल्या वकीला सोबत दील्लीला जाणार आहेत. अशी माहिती त्यांच्या पक्षांकडून सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version