गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक शारदा गणपतीची १२७ वर्षांत पहिल्यांदाच होणार मंदिरात प्रतिष्ठापना

शारदा गणपतीची १२७ वर्षांत पहिल्यांदाच होणार मंदिरात प्रतिष्ठापना

पुणे, २८ जुलै २०२०: पुण्याच्या गणोत्सवात महत्वाचे स्थान असलेला अखिल मंडई मंडळाचा गणपती दरवर्षी या मंडळाकडून विविध उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करण्यात येतो.

मात्र यंदाच्या वर्षी या मंडळाकडून १२७ वर्षांमध्ये शारदा गणपतीची पहिल्यांदाच मंदिरातच प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून हलविण्यात येणार नसल्याचे थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version