गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट शिखर धवन च्या जागी मयंक अग्रवालला संधी

शिखर धवन च्या जागी मयंक अग्रवालला संधी

नवी दिल्ली: भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जखमी शिखर धवनची जागा घेईल. कर्नाटकातील २८ वर्षीय क्रिकेटपटूला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांच्या स्वरूपात पदार्पण करण्याची संधी मिळू शकेल.
भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध चेन्नई (१५ डिसेंबर), विशाखापट्टणम (१८ डिसेंबर) आणि कटक (२२ डिसेंबर) येथे एकदिवसीय सामने खेळणार आहे. सय्यद मुश्ताक अली टी -२० करंडक दरम्यान धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजविरूद्ध सध्याच्या टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेत जखमी शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश होता. एकदिवसीय मालिकेपूर्वी धवन तंदुरुस्त असेल असं वाटत होतं, पण त्याची दुखापती अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version