गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे शिरूरमध्ये बिबट–मानव संघर्ष रोखण्यासाठी AI अलर्ट सिस्टीम

शिरूरमध्ये बिबट–मानव संघर्ष रोखण्यासाठी AI अलर्ट सिस्टीम

शिरूर तालुक्यात बिबट्याचा अत्यधिक वावर असलेल्या १२ संवेदनशील ठिकाणी मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर AI आधारित अलर्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे.

या अत्याधुनिक प्रणालीमध्ये बिबट मार्गावरून जात असताना त्याच्या शरीरावरील पॅटर्न ओळखला जातो आणि लगेच सायरन वाजतो. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना बिबट्याच्या उपस्थितीची माहिती मिळून ते सावध राहू शकतात.

ही प्रणाली पिंपळाचा मळा मांडवगण फराटा, फराटेवाडी मांडवगण फराटा, शिवनगर इनामगाव, फिरंगी मळा पिंपळसूटी, घायतडक वस्ती करडे, अन्नापूर, संगमवाडी मसे बुद्रुक, आमदाबाद, निमोणे, निमगाव धुडे, जांबुत आणि पिंपरखेड या गावांमध्ये बसविण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी उपवनसंरक्षक जुन्नर मा. श्री. प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि शिरूर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

वनविभागाच्या म्हणण्यानुसार, ही AI आधारित अलर्ट सिस्टीम ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि बिबट–मानव संघर्ष कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे

error: Content is protected !!
Exit mobile version