गोल पोस्ट इतर राजकारण पुण्यात शिवसैनिकांनी येडुरप्पांच्या प्रतिकातमक पुतळ्याचे दहन कर्नाटक सरकारचा केला निषेध 

पुण्यात शिवसैनिकांनी येडुरप्पांच्या प्रतिकातमक पुतळ्याचे दहन कर्नाटक सरकारचा केला निषेध 

पुणे, दि.९ ऑगस्ट २०२०: कोरेगाव-भीमा येथे आज कर्नाटक बेळगाव येथील मंगुत्ती गावांमधील काही शिवद्रोही लोकांनी आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटवला. या घटनेच्या निषेधार्थ कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथे आज  या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला याप्रसंगी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणा देत मुख्यमंत्री येडुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा सल्लागार अनिल काशीद, शिरूर तालुका उपप्रमुख मधुकर भंडारे, रोहिदास शिवले, अण्णा हजारे, संतोष भालेराव, प्रकाश काशिद, संग्राम ढेरंगे, गोविंद कांबळे, सिद्धेश्वर माने, व इतर शिवसैनिक यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून हे आंदोलन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version