गोल पोस्ट इतर राजकारण शिवसेनेने पाच बंडखोरांची पक्षातून केली हकालपट्टी….

शिवसेनेने पाच बंडखोरांची पक्षातून केली हकालपट्टी….

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटप आणि तिकीट वाटपादरम्यान नाराज झालेल्या इच्छुकांनी बंड पुकारले होते. दरम्यान शिवसेनेने पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र तृप्ती सावंत, राजु पटेल आणि सुरेश भालेराव या तिघा बंडखोरांबाबत अद्याप कोणता निर्णय घेतलेला नाही.

तत्पूर्वी भाजपने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेनेही कारवाई सुरु केली आहे. उस्मानाबाद मतदारसंघातील महेश चिवटे आणि सोलापूरमधील प्रवीण कटारिया आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे तर माढ्यातील एका बंडखोराला पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

विशेष म्हणजे वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील आमदार तृप्ती सावंत, वर्सोवातील नगरसेविका राजुल पटेल आणि घाटकोपर पश्चिममधील सुरेश भालेराव या बंडखोरांबाबत मात्र कारवाई करण्याबाबत शिवसेनेने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version