गोल पोस्ट इतर राजकारण शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना, भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना, भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

ठाणे १४ जून २०२३: लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये निर्माण झालेली तेढ, शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले सूतोवाच आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेली लगबग या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीतील भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रांमध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे ही शिवसेनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी असलेल्या कोल्हापूरचा दौरा अचानक रद्द केला. या घडामोडींवर विरोधक आणि भाजपच्या काही नेत्यांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.

राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत. शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेटी घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version