गोल पोस्ट इतर राजकारण मुंबई डबेवाला संघटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा

मुंबई डबेवाला संघटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा

मुंबई, १३ अक्टोबर २०२२ : शिवसेनेतील बंडखोरीनंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे वेगवेगळे गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी डबेवाले संघटना तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना संघटना त्यांच्याबरोबर होती. आता देखील आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. त्याच बरोबर ते आम्हाला जी जबाबदारी देतील ती आम्ही पार पाडू असे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले.

मागील निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेकडून मुंबईच्या डबेवाल्यांना काही आश्वासने दिली होती. त्यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही अजुनही शिल्लक आहेत. पुढील काळात ती देखील पूर्ण करण्याची मागणी संघटनेकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे यावेळी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी आम्हाला पत्र द्यायला सांगितलयाचेही मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version