गोल पोस्ट इतर राजकारण शिवसेनेचा दसरा मेळावा ‘शिवतीर्थावरच’ होणार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बैठकीत निर्धार

शिवसेनेचा दसरा मेळावा ‘शिवतीर्थावरच’ होणार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बैठकीत निर्धार

मुंबई, १८ सप्टेंबर २०२२ : शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील ‘शिवतीर्थ’ म्हणजे शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांना सांगितलं की, भ्रमात न राहता रॅलीच्या तयारीला लागा. शिवतीर्थावर दसरा मेळावा आपलाच होणार आहे. यासाठी तातडीने कामाला लागा, अशा थेट सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले आहेत.

शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. आगामी दसरा मिळाव्यावर चर्चा केली, यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

यासोबतच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र ते गुजरात या वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावर पहिल्यांदाच विधान केले, ते म्हणाले वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले, पण आत्ताचे सरकार अपयशाचे खापर आपल्यावर फोडत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version