गोल पोस्ट इतर शिवेंद्रराजे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट; चर्चांना उधाण

शिवेंद्रराजे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट; चर्चांना उधाण

पाचगणी, २५ एप्रिल २०२३: सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या जन्मगावी दरे तांब या गावी भेट घेतली. सातारा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात शिवेंद्रराजे भोसले आणि एकनाथ शिंदे यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यात जिल्ह्याच्या मुळ गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना त्यांची भेट आमदार शिवेंद्रराजांनी घेतल्याने राजकीय चर्चांना आता उधाण आलं आहे.

वर्ल्ड हेरिटेज कास पठारावरील १५४ बांधकामांना अधिकृत करण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा जिल्हाधिकारी यांना आदेश पारित करावा अशी विनंती केली आहे. तसेच राज्यातल्या होणाऱ्या राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील ते आम्हाला बांधील असेल असेही शिवेंद्रराजे भोसले यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version