गोल पोस्ट महाराष्ट्र वाढे येथे शिवशाही प्रतिष्ठानची शिवजयंती उत्साहात साजरी

वाढे येथे शिवशाही प्रतिष्ठानची शिवजयंती उत्साहात साजरी

वाढे, सातारा, २१ फेब्रुवारी २०२४ : शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती महोत्सव साजरा करताना किल्ले सर्व लहान-थोर शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले अजिंक्यतारा येथून शिवज्योत गावात आणण्यात आली. त्यानंतर शिवभक्त व महिलांच्या उपस्थितीत शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ह. भ. प. शिवशाहीर सुभाष जाधव यांचा शौर्य गीत व शिवगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मुलांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावर भाषणे केली. संध्याकाळी शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक पार पडली. या सोहळ्याला वाढे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.सदस्य, वि. सेवा सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक, महिला, ग्रामस्थ यांच्यासह शिवशाही प्रतिष्ठानचे सर्व सहकारी, पदाधिकारी शिवभक्तांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात पार पडला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version