गोल पोस्ट इतर धक्कादायक घटना; मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी केली आत्महत्या

धक्कादायक घटना; मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी केली आत्महत्या

मुंबई,२० ऑक्टोबर२०२२: मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आज सकाळी सातच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे‌. पारस पोरवाल हे काळाचौकी परिसरातील शांतीकमल टॉवरमध्ये राहतात.

पोरवाल हे आज सकाळी आपल्या याच इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्ती कडून सांगण्यात आले आहे की, पारस पोरवाल यांना आर्थिक अडचण होती. काही दिवस ते तनावामध्ये होते असेही सांगण्यात येत आहे.

त्याच टेन्शनमध्ये असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. विषेश म्हणजे पारस पोरवाल यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली असून या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान अजून अशीही माहिती समोर आली आहे‌ की, शांतीकमल टॉवरमध्ये पोरवाल यांच्या नावावर वरचे तीन ही मजले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version