गोल पोस्ट महाराष्ट्र आमदार कुचे यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण बाळ निराधार समिती बैठक संपन्न !

आमदार कुचे यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण बाळ निराधार समिती बैठक संपन्न !

बदनापूर, जालना, ३१ जानेवारी २०२४ : बदनापूर तालुक्यात संजय गांधी निराधार समितीची बैठक आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली. या बैठकीत श्रावण बाळ निराधार योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. आमदार नारायण कुचे यांनी तहसील कार्यालय येथे उपस्थित वयोवृध्द व दिव्यांग असलेल्या नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, या योजनेसाठी पात्र असलेला एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊनच काम करीत आहोत यावेळी उपस्थित तहसीलदार विजय दावनगावकर, नायब तहसिलदार दळवी, यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच संजय गांधी निराधार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आदील खान

error: Content is protected !!
Exit mobile version