गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे सिंहगड रस्ता हादरला! भटक्या कुत्र्यांनी सात मुलांवर हल्ला, भीतीचं सावट

सिंहगड रस्ता हादरला! भटक्या कुत्र्यांनी सात मुलांवर हल्ला, भीतीचं सावट

सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडगाव भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गुरुवारी सायंकाळी महापालिकेच्या शाळेसमोर खेळणाऱ्या सात मुलांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन मुले गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर जयप्रकाश नारायण-नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांच्या मते, या भागात इतर ठिकाणाहून कुत्री आणून सोडली जातात, ज्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांनी महापालिकेला या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. योग्य उपाययोजना न झाल्यास परिसरातील भीती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version