पुणे, २१ ऑक्टोबर २०२२ : ८०-९० च्या दशकातील रामानंद सागर यांच्या रामायाणा विषयी प्रेक्षकांच्या मनात खूप आदर आणि प्रेम आहे. शिवाय, रामायण आणि बीआर चोप्रा यांचे महाभारत लॉकडाऊन दरम्यान दूरदर्शनवर पुन्हा प्रसारीत करण्यात आले होते. यामुळे यातील प्रमुख किरदार पुन्हा एकदा घरोघरी पोहचले, त्यांना तेवढेच प्रेम आणि लोकप्रियता मिळाली. रामायणमधील सीतेची भूमिका करणारी दीपिका चिखलिया आता सोशल मीडिया वापरते आणि तिच्या चाहत्यांशी ऑनलाइन संपर्क साधत आहे.
दीपिकाने नुकताच तिचा ग्लॅमरस लूक मधला एक रील शेअर केला. त्यात तीने हिरव्या रंगाचा ड्रेस आणि हाय हिल्स घातले आहेत. काहींना तो आवडला, काहींनी तिचे कौतुक केले, काही लोक आश्चर्यचकित झाले पण काहींनी दीपिका ला खूप ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. “तुम्हाला हे सर्व शोभत नाही”, अश्या लोकांनी तीच्या रील वर कमेंट्स केल्या.
रामानंद सागर यांच्या रामायणाचा प्रभाव अजून तेवढाच आहे की लोक आजही या कलाकारांना खरे श्री राम, लक्ष्मण, सीता मानतात. हेच कारण आहे ज्यामुळे लोक दीपिका चा आधुनिक अंदाज पसंत करत नाहीत, असे दिसते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर