गोल पोस्ट महाराष्ट्र नागपूरच्या श्रीमती दीपा सुटे यांनी पटकावला मिसेस गोवाचा खिताब

नागपूरच्या श्रीमती दीपा सुटे यांनी पटकावला मिसेस गोवाचा खिताब

नागपूर २१ मार्च २०२४ : नागपूर जिल्ह्यातील घरगुती महिलांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात आघाडी घेत, नागपूरचे नाव केवळ देशातच नव्हे तर विदेशातही नाव कोरले आहे. आजच्या ग्लॅमरच्या दुनियेत फॅशनलाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, यात अनेक युवक युवतींनी बाजी मारली असून यातीलच मिसेस दीपा किरण सुटे या महिलेने ‘मिसेस फेस ऑफ द नेशन गोवा’ फॅशन विकमध्ये भाग घेत विनरचा मुकुट आपल्या नावावर केला आहे. स्वतः गृहिणी असून तिने घर सांभाळून आपल्या स्वप्नांची पूर्ती केली आहे. ४० स्पर्धकांमधून तिची निवड करण्यात आल्यामुळे हा तिच्यासाठीच नव्हे तर नागपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

नागपूर येथील दीपा किरण सुटेला लहानपणापासूनच फॅशनची आवड होती, परंतु तिचे विसाव्या वर्षी लग्न झाल्याने ती आवड लग्न झाल्यानंतर पूर्ण केली. तिने या सोबतच मुंबईला एक्टिंग कोर्स सुद्धा एक वर्षाचा पूर्ण केला असून तिने स्कीट शो तसेच शॉर्ट फिल्म संस्कार मध्ये सुद्धा काम केले असुन आता लवकरच येणाऱ्या लास्ट बेंच या मुव्ही मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. फॅशनची रितसर प्रशिक्षण घेत असताना गोव्यामध्ये ५ मार्च २०२४ रोजी, मिसेस फेस ऑद नेशन गोवा फॅशन विक होणार असल्याचे दीपाला माहित होताच लगेच त्यांनी या स्पर्धेस भाग घेण्याचे निश्चित करत ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली, त्यांच्या पतीनेही तिला संमती दिली आणि येथून खऱ्या अर्थाने तिचे कठोर प्रशिक्षण सुरू झाले.

चार दिवसाच्या या फॅशन विकसाठी मिसेस दीपा सुटे गोव्यातील संनसिटी रिसॉर्ट मध्ये पोहचली होती. या शोमध्ये दोन फेऱ्या झाल्यात. दीपा यांनी यात चांगली कामगिरी बजावली. ४० स्पर्धकांमध्ये मिसेस दीपा सुटे यांनी विनरचा मुकुट आपल्या नावावर करत प्रशस्तीपत्र व ट्रॉफीवर आपले नाव कोरले असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

error: Content is protected !!
Exit mobile version