गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सोलापुरात पोलिसाची स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या

सोलापुरात पोलिसाची स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या

सोलापूर १५ नोव्हेंबर २०२३ : केशवनगर पोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने, दिवाळीच्या भाऊबीज सणाच्या दिवशी सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल शिरसाट असे त्या पोलिसाचे नाव आहे.

ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनी शासकीय रुग्णालयातील ॲम्बुलन्स मागून मृतदेह विच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल कडे रवाना केला आहे. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची एकच गर्दी झाली असून आक्रोश सुरू आहे नेमकी आत्महत्या कशामुळे केली याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. परंतु या पोलिसाने स्वतः जवळील असलेल्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती मिळत आहे. नेमकी घटना कशामुळे घडली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनीधी : दगडू कांबळे

error: Content is protected !!
Exit mobile version