गोल पोस्ट महाराष्ट्र पावसामुळे छत्रपती संभाजीनगरचा सोयगाव- बनोटी रस्ता पाण्यात

पावसामुळे छत्रपती संभाजीनगरचा सोयगाव- बनोटी रस्ता पाण्यात

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर २९ जुलै २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव शहरासह परिसरात कालपासून रिपरिप पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान काही भागात पावसाचा जोर अधिक होता.

दरम्यान पावसामुळे सोयगाव ते बनोटी रस्ता, घोसला ते नांदगाव आणि बहुलखेडा ते निमखेडी या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने रस्ता पाण्यात बुडाला. त्यामुळे दुपार नंतर या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान पावसाच्या रिपरिप मुळे शेतात गेलेल्या मजुरांना दुपार पूर्वीच घरी परत यावे लागले. रिपरिप पावसाने सोयगाव ते बनोटी रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले पाहायला मिळाले.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय चौधरी

error: Content is protected !!
Exit mobile version