गोल पोस्ट समाजकारण आंदोलन इंदापूर मध्ये बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

इंदापूर मध्ये बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

इंदापूर, ८ डिसेंबर २०२०: केंद्र सरकारनं केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी दिनांक आठ रोजी भारत बंदचं आवाहन केलं होतं. याच आवाहनाला प्रतिसाद देत इंदापूर शहरासह तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यात भारत बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पहावयास मिळाला.

विशेष म्हणजे इंदापूर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील अगदी नगण्य होती. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. केंद्र सरकारनं लादलेले अन्यायकारक कृषी विधेयक रद्द करावी या मागणीसाठी इंदापुरातील विविध संघटना विरोधी पक्षनेते यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

एकंदरीतच विरोधकांनी पुकारलेल्या केंद्र सरकारच्या विरोधातील भारत बंदला इंदापूर तालुक्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version