गोल पोस्ट व्हिडिओ स्पोर्ट्स अपडेट | News Uncut

स्पोर्ट्स अपडेट | News Uncut

Sports Update News Uncut: संपूर्ण स्पोर्ट्स, सामाजिक व आंतरराष्ट्रीय अपडेट्स – फक्त @newsuncutchannel वर! भारत आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक टी-20 मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये स्टार खेळाडूंची पुनरागमनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे! दुसरीकडे, न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील व्हाईट बॉल मालिकेसाठी 8 शानदार ठिकाणांची निवड झाली आहे. नेपाळ आणि वेस्ट इंडिज सप्टेंबरमध्ये शारजाह येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत, तर भारताच्या सुरुची सिंगने ISSF वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला! MCCने क्रिकेटच्या झेल नियमात महत्त्वाचा बदल केला आहे, ज्यामुळे सीमारेषेवर ‘बनी हॉप’ अवैध ठरले आहे. पाकिस्तानच्या टी-20 संघातून बाहेर पडण्याचे संकेत मिळताच बाबर आझमने दुसऱ्या संघाचा हात धरला आहे. विम्बल्डनच्या बक्षिस रकमेत वाढ झाली असून, दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’मध्ये नाशिकच्या 4 धावपटूंनी सहभाग नोंदवला आहे. क्रिकेट, शूटिंग आणि धावण्याच्या या रोमांचक अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहा!

error: Content is protected !!
Exit mobile version