गोल पोस्ट इतर राजकारण जलालपूर येथे संपुर्ण गावात तन नाशक औषध फवारणी

जलालपूर येथे संपुर्ण गावात तन नाशक औषध फवारणी

कर्जत, दि. १२ जुलै २०२०: कर्जत तालुक्यातील जलालपूर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने पावसाळ्यात मोकळ्या जागेत गवत आणि काटेडी झुडपे हे फार मोठ्या प्रमाणात येत असतात. या मुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेत ग्रामपंचायत ने महत्वाच्या ठिकाणी तन नाशक फवारणी केली आहे.

जलालपूर मधील प्रमुख ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने तन नाशक फवारणी करण्यात आली. या वेळी मशानभुमी ग्रामपंचायत समोरील परिसर शाळे शेजारी बाजूस आणि मुख्य चौकात ज्या ठिकाणी नागरिकांनाची वर्दळ असती त्या संपुर्ण ठिकाणी फवारणी करण्यात आली.

मशानभुमी तानाजी घाट सज्जन व्यासपीठ या ठिकाणी फवारणी करण्यात आली. नागरिकांनी वेळोवेळी तक्रार केली होती की, मयत व्यक्तला त्यांच्या अत्यविधी साठी खुप काटे आणि सराटे या मुळे पायाला काटे टोचत असत त्या मुळे ग्रामपंचायतच्या वतीने तन नाशक फवारणी करण्यात आली

या वेळी त्या ठिकाणी ग्रामपंचायत चे लेखणीक रघुनाथ ननवरे, अमोल शिंदे, विशाल जगताप, फवारणी करणारे देवा कांबळे आणि शिवसैनिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version