गोल पोस्ट महाराष्ट्र मनसे चित्रपट सेनेची राज्यव्यापी आढावा बैठक पुण्यात संपन्न

मनसे चित्रपट सेनेची राज्यव्यापी आढावा बैठक पुण्यात संपन्न

पुणे, १८ सप्टेंबर २०२०: महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची राज्यव्यापी आढावा बैठक नुकतीच म.न.चि. क.से. अध्यक्ष मा. अमेय खोपकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील २०० पदाधिकारी यांच्या नेमणुका प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आल्या, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट सेनेच्या माध्यमातून कलाकारांसाठी करण्यात आलेल्या सामाजिक कामाचा आढावा देखील जिल्हानिहाय घेण्यात आला.

यावेळी काही महत्वपूर्ण प्रवेश सुद्धा घेण्यात आले, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस कला सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. योगेश सुपेकर यांनी त्यांच्या समर्थकांसह प्रवेश केला तसेच अन्य जिल्ह्यातील देखील पक्ष प्रवेश घेण्यात आले.

तरी यावेळी मनसेच्या माध्यमातून मार्च ते सप्टेंबर पर्यंत विविध वंचित घटकांना जेवण, धान्य, औषधे इ. प्रकारची मदत करत असल्याबद्दल म. न. वि. से. चे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री सारंग सराफ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी चित्रपट सेनेचे सरचिटणीस शशांक नागवेकर, संदीप सावंत, उपाध्यक्ष रमेश परदेशी तसेच अॅड. किशोर शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष चेतन धोत्रे, पुणे शहराध्यक्ष आनंद कुंदूर यांनी केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version