गोल पोस्ट इतर राजकारण कालठण क्रमांक २ च्या उपसरपंचपदी सुग्रा मखराणी….

कालठण क्रमांक २ च्या उपसरपंचपदी सुग्रा मखराणी….

इंदापूर, दि.१२ सप्टेंबर २०२०: इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रातील कालठण क्रमांक २ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सुग्रा मखरानी यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

पूर्वीचे उपसरपंच अर्जुन गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी मखरानी यांनीच फक्त अर्ज आला होता.

सरपंच अनिल जाधव यांनी मखरानी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी जेष्ठ नेते भारत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मखरानी यांनी सांगितले.

यावेळी नूतन उपसरपंच सुग्रा मखरानी यांचा सन्मान युवा नेते अमित जगताप यांनी केला.यावेळी जगताप यांनी ऐन निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळला असल्याची भावना मखरानी यांनी यावेळी न्यूज अनकट अशी बोलताना व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version