गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पैलवान ग्रुपच्या राज्य निवड समिती सदस्यपदी सुहास खुटवड यांची निवड

पैलवान ग्रुपच्या राज्य निवड समिती सदस्यपदी सुहास खुटवड यांची निवड

फुरसुंगी, ९ ऑगस्ट २०२०: पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य या कुस्तीशी निगडित संस्थेच्या राज्य निवड समिती सदस्यपदी फुरसुंगी येथील नामवंत पैलवान सुहास आबा खुटवड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडीचे पत्र देताना पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जागतिक विजेता पैलवान विलास दादा देशमुख, हिंद केसरी अमोल बराटे, भारत केसरी पैलवान विजय गावडे, ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान सागर गरुड, व पैलवान प्रीतम काळभोर, यांची उपस्थिती होती.

सुहास खुटवड हे चांगले पैलवान होते व महाराष्ट्रभर कुस्ती मैदानासाठी फिरत असतात व सक्रिय सहभागी असतात. फुरसुंगी येथील खुटवड घराण्याचा कुस्तीचा मोठा वारसा आहे. त्यांच्या निवडीमुळे हवेली परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version