गोल पोस्ट इतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पुणे, १८ जानेवारी २०२३ : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्याल्यातील वसतिगृहात राहणाऱ्या ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने मंगळवारी (ता. १७) दुपारी खोली क्रमांक १२० मधील छताच्या पंख्यास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

औरंगाबाद येथील साक्षी गायकवाड ही विद्यार्थिनी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. ही विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. मंगळवारी (ता.१७) दुपारी या विद्यार्थिनीने वसतिगृहातील १२० क्रमांकाच्या खोलीतील छताच्या पंख्यास गळफास लावून आत्महत्या केली. या विद्यार्थिनीची उद्यापासून परीक्षा सुरू होणार होती अशी माहिती आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version