गोल पोस्ट महाराष्ट्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्याचा घेतला आढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्याचा घेतला आढावा

पुरंदर, दि. १९ जून २०२०: बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुरंदर तालुक्यात भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर मधील विविध विषयांचा आढावा घेतला. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी येथील शेती विषय काय समस्या आहेत का? किंवा आरोग्यविषयक समस्या याबाबतची विचारणा केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

पुरंदरचे आमदार संजय जगताप, पंचायत समिती सभापती ललीनी गोळे, पुरंदरचे-दौंडचे प्रांत अधिकारी प्रदिप गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, सासवड, जेजुरी पोलिस स्टेशनचे अधिकारी यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खा. सुळे म्हणाल्या की, कोरोनामुळे कामाच्या पद्धतीत मोठा बदल करावा लागलेला आहे. लोकसंपर्क करत असताना तंत्रज्ञानाचा वापर करावा लागत आहे. कोरोनाच्या बाबात माहिती घेत असताना किंवा काम करत असताना प्रशासनाची संपर्क साधत असताना सोशल मीडियाचा वापर करावा लागला. गेल्या साडेतीन महिन्यात प्रशासनाने खूप महत्त्वाच काम केले, आणि अत्यंत चांगलं काम केले आहे. अगदी पुणे जिल्ह्याचे एसपी हे सुद्धा आपल्या कुटुंबापासुन दुर रहात काम करीत होते. सोशल डिस्टंनस पाळत मुलांन पासुन दुर रहात घराच्या बाहेर जेवण करायचे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. याकाळातील समाधानाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यामध्ये कोणीही या काळामध्ये उपाशी राहिल नाही. कोणी उपाशी राहणार नाही यासाठी प्रशासनाने मोठी जबाबदारी घेतली होती. या काळामध्ये जे परराज्यातील कामगार होते त्यांना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. दुर्दैवाने त्यांना ईथुन जावं लागलं. या कामगारांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही स्वतः शरद पवार आणि मी केंद्रातील मंत्र्यांची संपर्क साधून या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांच्या घरी कसे पाठवता येईल याबाबत प्रयत्न केले. असे त्या म्हणाल्या.

त्याच बरोबर सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री जयशंकर यांचे विशेष आभार मानले. कारण ज्यावेळी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या राज्यातील मुले परराज्यात, किंवा परदेशात अडकली होती त्यांना माघारी आणण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी तातडीने मदत करित विद्यार्थ्यांना घरी येण्यास मदत केली. अस त्या म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघ व शिरूर लोकसभा मतदारसंघांमधून या काळामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून खासदार अमोल कोल्हे मी आणि या भागातील सर्वच आमदार आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होतो. कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा औषध कमी पडू नये म्हणून प्रयत्न करत होतो. त्याबरोबर या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणीटंचाई जाणवली नाही. जनावरांच्या चा-याचा किंवा औषधाचा प्रश्न उद्भवला नाही. ही आनंदाची बाब आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ही अत्यंत उत्तम काम झाले.

जेजुरीचा खंडोबाच्या दर्शनासाठी पायरीवर दर्शनाची सोय करण्याची मागणी होते आहे किंवा त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर टीव्ही जोडा अशीही मागणी होते आहे. याबाबत विचार करण्यात येईल. त्याचबरोबर सलूनबाबातचा एक प्रश्न आहे. तो सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत विचार विनीमय सुरू आहे. पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेवुन सलुन सुरू करण्यासंदर्भात काहीतरी उपाययोजना करता येतील. काही अटी व शर्तीनवर सलुन बाबात निर्णय घेतला जाईल. असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी :राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version