गोल पोस्ट महाराष्ट्र ‘स्वर्णिमा’ योजना मागासवर्गीय महिलांना ५% व्याजाने २ लाखांपर्यंत कर्ज!

‘स्वर्णिमा’ योजना मागासवर्गीय महिलांना ५% व्याजाने २ लाखांपर्यंत कर्ज!

मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याकरिता केंद्र सरकारने ‘स्वर्णिमा’ ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना फक्त ५ टक्के वार्षिक व्याजदराने जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिले जाणारे हे कर्ज महिलांना कृषी, लघुव्यवसाय, कारागीर आणि सेवा उद्योगासाठी उपलब्ध आहे.

कर्जाची परतफेड आठ वर्षांच्या मुदतीत करता येणार आहे. ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या या कर्जासाठी पात्र असतील. सामाजिक कार्यकर्त्या अनिता मंगवाणी यांनी या फायदेशीर योजनेची अधिक जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी www.nbcfdc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version