गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे महिलांच्या आरोग्यासाठी ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ अभियान सुरू

महिलांच्या आरोग्यासाठी ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ अभियान सुरू

‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ या राष्ट्रीय अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथे करण्यात आला आहे. हे अभियान आता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण पुणे ग्रामीण भागात लागू झाले असून, महिलांना आरोग्यसेवा पुरवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या काळात हे अभियान चालणार आहे. यामध्ये महिलांना कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोगांसारख्या आजारांची तपासणी, निदान आणि उपचार मोफत मिळणार आहेत. यासोबतच, सर्व आवश्यक शस्त्रक्रिया आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गावोगावी आणि पाड्या-पाड्यांवरच्या महिलांनी या आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version