गोल पोस्ट महाराष्ट्र आमदार नारायण कुचेवर कारवाई करा, भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडे कार्यकर्त्यांची तक्रार

आमदार नारायण कुचेवर कारवाई करा, भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडे कार्यकर्त्यांची तक्रार

जालना ७ फेब्रुवारी २०२४ : बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचे हे अपमानजनक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. विहिरीचा प्रस्ताव मंजुर करण्यासंदर्भात भेटण्यासाठी गेलेल्या पदवीधर तरुणाचा कुचे यांनी अपमान केलाय. प्रताप कवाळे तरुणाचे नाव आहे. प्रताप हा भाजपा चा कार्यकर्ता आहे. तु दारु पिऊन आला का, तुझ्या अंगाचा वास येतो, अशी भाषा वापरुन कुचे यांनी तरुणाला वाईट वागणूक दिली.

त्या अपमानास्पद वक्तव्याबाबत तरुण कार्यकर्त्यांने आमदार कूचे यांना थेट फोन लावून विचारणा केलीय. विचारणा केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. आमदार कुचे यांनी आपण तसे बोललो असल्याची कबुली देखील त्या तरुणाला दिलीय. आमदार नारायण कुचेवर कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडे त्या कार्यकर्त्यानी केलीय. आता पक्ष काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version