गोल पोस्ट जिल्हा रत्नागिरी लोकप्रतिनिधींची वेळ घेऊन उन्हाळ्यातील पाणी टंचाईचे आराखडे तयार करावे– मंत्री उदय सामंत

लोकप्रतिनिधींची वेळ घेऊन उन्हाळ्यातील पाणी टंचाईचे आराखडे तयार करावे– मंत्री उदय सामंत

रत्नागिरी २९ नोव्हेंबर २०२३ : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रत्नागिरी जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सह प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पाणी टंचाईबाबत आराखडे तयार करावेत. पाणी टंचाईबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना कल्पना द्यावी. १५ जानेवारीपर्यंत त्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळेल हे पहावे. १ एप्रिल पासूनच्या पाण्याच्या नियोजनाची तयारी आतापासून करावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यात झालेला पाऊस, धरणांमधील पाणीसाठा, मागील वर्षाची टँकर परिस्थिती याबाबतचा समावेश होता. यावेळी उदय सामंत यांनी जात पडताळणी संदर्भातही आढावा बैठक घेऊन प्रलंबित असणारी कामे मार्गी लावण्याची सूचना केल्या.

न्युज अनकट प्रतिनीधी : केतन पिलणकर

error: Content is protected !!
Exit mobile version