गोल पोस्ट क्रीडा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२२ साठी टीम इंडियाची घोषणा

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२२ साठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई, १३ सप्टेंबर २०२२ : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषकासाठी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या ,रविचंद्र अश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, हर्षदीप सिंग, भुवनेश्वर कुमार ,जसप्रीत बुमराह, चहल , अक्षर पटेल

राखीव खेळाडू. :

मोहम्मद शमी, दीपक चहर ,रवी बिश्नोई , आणि श्रेयस अय्यर

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत .विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही विकेटकीपर फलंदाजांना स्थान संघात मिळालं आहे. भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे .

टी ट्वेंटी विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे, २७ ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा सामना खेळणार आहे. तिसरा सामना ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेश बरोबर आणि पाचवा सामना सहा नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version