गोल पोस्ट इतर पर्यावरण भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, वाहन चालकांना कधी येणार शहाणपणा….

भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, वाहन चालकांना कधी येणार शहाणपणा….

पुणे, १४ ऑगस्ट २०२० : आज मध्यरात्री कात्रजच्या बोगद्याजवळ बिबट्याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.एकीकडे प्रशासन प्राण्यांना वाचवण्यासाठी अनेक विविध कार्यक्रम करत असताना नागरिक त्याला जुमानत नसल्याचे दिसत आहे. तर याघडल्या प्रकारमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला कात्रज बोगद्याजवळ पुण्याकडे येत असताना एक बिबट्या जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बिट मार्शल पोलीस नाईक ललित मोहिते, सुहास पवळे, रणजीत काटे यांनी बिबट्याला रस्त्याच्या बाजूला घेतले.

तसेच वनविभागाला या घटनेची माहिती दिली असून. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी सनस दाखल झाले आहे. मात्र बिबट्याला डोक्याला धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

बेदरक वाहन चालकामुळे प्राण्यांचे प्राण जात आहे. या घटना आधीही घडल्या आहेत. मात्र ते वाहन चालक सापडत नाहीत. किंवा तितक्या गंभीरपणे त्याचा तपास केला जात नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version