गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा माळीनगर येथील नीरा नदीवरील बंधाऱ्याचा भराव तुटला

माळीनगर येथील नीरा नदीवरील बंधाऱ्याचा भराव तुटला

सोलापुर, १९ ऑक्टोबर २०२२: गेल्या चार ते पाच दिवसांपासून घाटमाथ्यावर सूरु असलेल्या मुसळधार पावसाने माळशिरस तालुक्यातील निरा नदीला पुरस्थिती निर्माण झाली आहे. माळीनगर पूर्व भागात अनेक ठिकाणी नदीवरील बंधाऱ्याचा भराव तुटला आहे.

धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सूरु केला असून पाण्याच्या वेग खुप जास्त प्रमाणावर असल्याने नदीजवळ धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. पुणे, सातारा, सोलापुर या जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात चालु असल्याने धरण तुडुंब भरुन वाहत आहे.

त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांमध्ये सोडण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातही पुरस्थीती निर्माण झाली आहे. अकलाई-लुमेवाडी तांबवे-ओझरे बंधाऱ्यावर पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. यामुळे लुमेवाडी-माळीनगर व गिरवी-गणेशगाव या गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्यांचा भराव तुटला आहे.

दोन वर्षांपूर्वीच या बंधाऱ्यांची डागडूजी करण्यात आली होती. पुणे आणि सोलापुर जिल्ह्यांना जोडणारे महत्वाचे बंधारे वाहतूकीसाठी बंद झाल्याने दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता सध्या शाळांच्या परीक्षा सुरु असल्याने विधार्थीची प्रचंड गैरसोय होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version