गोल पोस्ट इतर राजकारण शिंदे गटाचे चिन्हदेखील वादाच्या भोवऱ्यात

शिंदे गटाचे चिन्हदेखील वादाच्या भोवऱ्यात

मुंबई, १५ ऑक्टोंबर २०२२ : केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार चिन्ह दिल आहे. दरम्यान, शीख समाजाने शिंदे गटाच्या या चिन्हावर आक्षेप घेतला आहे.

ढाल तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप नोंदवण्यात आला आहे. सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे.

काय म्हटले आहे निवेदनात?

शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्याने त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसेच हे निवेदन त्यांनी निवडणूक आयोगालाही पाठवलं आहे. एकनाथ शिंदे गटानं सूर्य हे चिन्ह मागितलं होतं. मात्र ते झोराम राष्ट्रीय पक्ष आणि द्रमुकशी संबंधित असल्यानं ते देण्यात आलं नाही. तर, ढाल तलवार हे चिन्ह पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडे होतं. पण ते पक्ष २००४ ला यादीतून वगळण्यात आल्यानं शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेने’ला दोन तलवार आणि एक ढाल हे चिन्ह मिळालं.

निवडणूक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाला शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे. तर, शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाणही गोठवण्यात आलं आहे. तर निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादात सापडली आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे.

तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे. तर या संदर्भातील निर्णय नाही झाला तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version