गोल पोस्ट इतर दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर बर्निंग कारचा थरार

दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर बर्निंग कारचा थरार

पुणे, १९ जानेवारी २०२३ : वलखेड फाट्यावर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथे बुधवारी (ता. १८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.

याविषयी अधिक माहिती अशी, की पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या इंडिका विस्टा कारचे (एमएच- १२, एफएन- ०७४५) वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामूळे कारने भररस्त्यात अचानक पेट घेतला. यावेळी कारमध्ये चालक बळीराम घडवजे हे एकटे होते. वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच ते वाहनाच्या बाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version