गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा हॅरी पॉटरच्या मित्राचे, हॅग्रिडचे दुःखद निधन

हॅरी पॉटरच्या मित्राचे, हॅग्रिडचे दुःखद निधन

पुणे, १५ ऑक्टोबर २०२२: हॉलिूवूड अभिनेता रॉबी कोल्ट्रेन याने ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रॉबी ची एजंट बेलिंडा राईट यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री रॉबी यांनी स्कॉटलंड जवळील फालक्रिक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मृत्यूचे कारण स्पष्ट केले नाही.

ही दुःखद बातमी ऐकताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. खास करुन हॅरी पॉटर सिरीज च्या चाहत्यांसाठी ही वार्ता धक्कादायक आहे. हॅरी पॉटर मधल्या रुबियास हॅग्रिड ने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. तोच हॅग्रिड जो हॅरी ला होगवर्ड्स पर्यंत घेऊन जातो. त्यांच्या भव्य अश्या शरिरयष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. चाहत्यांच्या मनात त्याने आपली एक खास जागा निर्माण केली होती. त्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. हॅग्रिड हिच त्यांची ओळख बनली. त्यांनी हॅरी पॉटर शिवाय देखील अनेक हॉलिूवूड चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले होते. जेम्स बाँड (गोल्डन आय), नॅशनल ट्रेझरी आणि टीव्ही शो क्रॅकरमध्ये ते झळकले होते.

गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते रुग्णालयात उपचार घेत होते आणि त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची खबर समोर आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर

error: Content is protected !!
Exit mobile version