गोल पोस्ट इतर राजकारण राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यावर्षी नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय झाला.

येत्या ७ डिसेंबरला अधिवेशन घेता येईल का आणि त्याचा कालावधी किती असावा हे ठरवण्यासाठी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.

आजच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version