गोल पोस्ट गुन्हा पुणे शहरात २४ तासांत तिसरा खुन; मांजरीत महिलेचा खून करून मृतदेह टाकून...

पुणे शहरात २४ तासांत तिसरा खुन; मांजरीत महिलेचा खून करून मृतदेह टाकून दिला विहरीत

पुणे, २५ एप्रिल २०२३: कोंढव्यात वृद्धाचा फर्शी डोक्यात घालून, तर खडकीत दुचाकीवर नोकरीस निघालेल्या महिलेवर धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच आता मांजरी बुद्रुक येथे महिलेचा धारदार हत्यारांने खुन करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २४ तासांत शहरात झालेली ही खुनाची तीसरी घटना आहे.

शेतावर काम करणाऱ्या महिलेचा धारदार हत्यारांने खुन केला. नंतर मृतदेह मांजरी बुद्रुक येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुरण फार्ममधील विहरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञातावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा अशोक देशमुख (५०. माळवाडी, कवडीपाठ, लोणी काळभोर) असं खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत स्नेहलता काळभोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहलता काळभोर यांचे शेत सांभाळण्याचे काम उषा देशमुख आणि त्यांचे पती गेली बऱ्याच वर्षांपासून करतात. आज सकाळी उषा देशमुख या काही कामानिमित्त शेतात गेल्या होत्या. पण त्या परत आल्या नाही म्हणून त्यांचे पती शोधण्यासाठी गेले असता त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुरण फार्ममधील विहरीत उषा देशमुख यांचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी ही माहिती शेत मालक काळभोर यांना दिली. काळभोर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फोन करून सांगितले. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुन कोणी केला ? यांचा पोलिस शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version