गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट या क्रिकेटर ने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून सन्यास

या क्रिकेटर ने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून सन्यास

मुंबई, ३ फेब्रुवरी २०२१: २०२० मधे भारतीय संघातून अनेक दिग्गज क्रिकेटर खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. तर २०२१ च्या  सुरवातीमधेच आणखी एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.
वेगवान गोलंदाज अशोक डिंडाने काल सायंकाळी निवृत्तीची घोषणा केली आहे. तसे भारताकडून फार कमी संधी अशोक डिंडा ला मिळाली. पण, जेव्हा ही डिंडा ला संधी मिळाली तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवत चांगली कामगिरी केली. अशोक डिंडाची कामगिरीमुळे प्रथम श्रेणीतीलं करिअर उत्तम राहीले.
डिंडाने भारताकडून खेळताना १३ वनडेत १२ विकेट घेतल्या तर ९ टी-20 मधे १७ बळी घेतले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११६ सामन्यात ४२० बळी टिपले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत डिंडाने गोव्याचे प्रतिनिधित्व केलं होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव
error: Content is protected !!
Exit mobile version