गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी या माणसाने चक्क ‘शार्क’सोबतच केला डान्स, अनोखा व्हिडीओ एकदा पाहाच ….

या माणसाने चक्क ‘शार्क’सोबतच केला डान्स, अनोखा व्हिडीओ एकदा पाहाच ….

पुणे, २६ ऑक्टोबर २०२२: समुद्रातील शार्क मासा म्हणजे सर्वात वेगवान शिकारी प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते त्यांच्या तीक्ष्ण दातांनी हल्ला करू शकतात. अशातच, जर मानव कधी त्यांच्या तावडीत सापडला तर काय होईल याची कल्पना करा. कधी कधी ते माणसांची शिकारही करतात. शार्कशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे.

शार्कशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, ज्यामध्ये ते कधी मानवांवर हल्ला करताना दिसतात तर कधी समुद्रातील लहान माशांची शिकार करताना दिसतात. त्यामुळे समुद्रात जाणारे लोक शार्कला घाबरतात आणि जर कधी तो दिसला तर लोक तिथून पळून जातात, या व्हायरल व्हिडीओमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळते. इथे एक व्यक्ती शार्कसोबत आनंदाने नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, शार्कसह अनेक मासे मोठ्या मत्स्यालयात पोहत आहेत. त्याच मत्स्यालयात, एक माणूस प्रवेश करतो आणि कोणतीही भीती न बाळगता शार्कसोबत रोमँटिक नृत्य सुरू करतो.

माणूस शार्कबरोबर कसा नाचतोय?

अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कूल व्हिडीओज नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या सात सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version