गोल पोस्ट महाराष्ट्र जालना जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जालना जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जालना, २६ जानेवारी २०२४ : पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या जिल्ह्याबाहेरील बदलीमुळे रिक्त झालेल्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी बीड येथून बदलून आलेले गजानन घाडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच परतुरचे पोलीस निरीक्षक मच्छीन्द्र सुरवसे यांची तालुका जालना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. शिवाय तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. तर मंठा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या बदल्यासंदर्भात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आदेश जारी केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version