गोल पोस्ट महाराष्ट्र नागपूर कारच्या धडकेत जखमी वाघांचा मृत्यू

कारच्या धडकेत जखमी वाघांचा मृत्यू

नागपूर, ११ ऑगस्ट २०२३ : गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया-कोहमारा येथील मूर्देली जंगल परिसरात काल रात्री १० वाजेच्या सुमारास कारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जखमी झाला होता. त्याला आज सकाळी रेस्क्यू करीत उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा येथे आणताना वाटेतच वाघांचा मृत्यू झाला आहे.

सदर नर वाघ हा नवेगाव नागझिरा मधील T१४ वाघीणीचा दोन वर्षाचा बछडा होता. कारच्या धडकेत हा वाघ गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या पायाला व पाठीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. या अपघाताची माहिती वनविभाग गोंदियाला मिळताच वनविभागाने रात्री पासूनच त्या वाघाला शोधण्याचे कार्य सुरू केले होते.

आज सकाळी पाच वाजेपासून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. यामध्ये वाघाला सकाळी जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर त्याला नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे. या वाघाचे शवविच्छेदन नागपूरला गोरेवाडा येथे करण्यात येणार असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version