गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी मेट्रोमधून केला चक्क डायनासोरने प्रवास

मेट्रोमधून केला चक्क डायनासोरने प्रवास

पुणे, ९ ऑक्टोबर २०२२: सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याची कल्पना करणे थोडे कठीण आहे. अशातच सोशल मीडियावर दररोज हजारो नवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच ते वेगाने व्हायरलही होतात. युजर्सना आश्चर्यकारक आणि थरारक व्हिडिओ खूप आवडतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मेट्रोमध्ये चक्क डायनासोर प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. चला तर पाहू काय घडलं नेमकं?

नुकताच समोर आलेला व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यामध्ये खास गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या मांडीवर एक विचित्र प्राणी पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या मांडीवर डायनासोरसारखा प्राणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मेट्रोतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

तो कोणालाच इजा करत नाही

मेट्रोमध्ये प्रवास करणारा हा प्राणी डायनासोरसारखा दिसत असला तरी तो एक प्रकारचा पपेट टॉय म्हणजेच खेळणी असल्यामुळे तो कोणालाच इजा करत नाही. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कलाकार त्याचा वापर करतात. असे आढळून आले आहे.

मिळाले १० मिलीयन व्ह्यूज

मेट्रोमध्ये व्यक्तीच्या मांडीवर डायनासोरसारखे दिसणारे खेळणे वापरण्यासाठी कलाकार त्याच्या एका हाताचा वापर करतो. या पपेटच्या आतून हालचाल करता येते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे बघून युजर्समध्ये मात्र भीती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडिओला १० मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version