गोल पोस्ट इतर भाविकांच्या विरोधानंतर तुळजाभवानी मंदिर समिती घेतलेला निर्णय बदलला

भाविकांच्या विरोधानंतर तुळजाभवानी मंदिर समिती घेतलेला निर्णय बदलला

तुळजापूर, ९ जुलै २०२३ : महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या देवी तुळजाभवानीच्या मंदिर समितीने, काही महिन्यापूर्वी तोकड्या कपड्यात येणाऱ्या भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली होती. यावरून वादंग सुरू झाल्यानंतर काही दिवसातच हा निर्णय रद्द करण्यात आला.

आता तुळजाभवानी मंदिरामध्ये अभिषेक पूजेसाठी तब्बल १० पट वाढ करण्यात आली होती. त्यामुळे ५० रूपयांत होणाऱ्या अभिषेक पूजेसाठी भाविकांना ५०० रूपये मोजावे लागणार होते. यामुळे भाविकांच्यात नाराजी परली होती. तर मोठ्या प्रमाणावर विरोधही होत होता. त्यानंतर आता वाढ करण्यात आलेली दरवाढ मंदिर प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे.

त्याचबरोबर व्हिआयपी दर्शन देखील सुरू करण्यात आले आहे. तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी वाढीव दरवाढ ही लागू करण्याबाबत निर्णय झाला होता. तर तो सोमवार पासून लागू केला जाणार होता. मात्र या निर्णयाला भाविकांनी त्याच बरोबर पुजाऱ्यांनी विरोध केल्याने अखेर मंदिर प्रशासनाला हा निर्णय रद्द करावा लागला. तर मोफत व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version