गोल पोस्ट महाराष्ट्र सिमेंट बंधाऱ्याच्या पाण्यात पडून दोन मुलींचा मृत्यू, तर एकीची प्रकृती गंभीर.

सिमेंट बंधाऱ्याच्या पाण्यात पडून दोन मुलींचा मृत्यू, तर एकीची प्रकृती गंभीर.

नांदगाव, नाशिक १० नोव्हेंबर २०२३ : कपडे धुण्यासाठी नांदगाव तालुक्यातील चिंचविहिर परिसरातील सिमेंट बंधाऱ्यावर गेलेल्या दोन मुलींचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर एका मुलीला वाचविण्यात नागरिकांना यश आले. चिंचविहीर (ता.नांदगाव) येथे ही घटना घडली.

चिंचविहीर गावातील तांड्यावरच्या काही मुली कपडे धुण्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास गावातल्या सिमेंट बंधाऱ्याकडे गेल्या होत्या. यात नववीमध्ये शिकणारी पूजा अशोक जाधव व खुशी देवीदास भालेकर आणि कावेरी या कपडे धुतांना पाय घसरल्याने बंधाऱ्यातील पाण्यात पडल्या. मुली पाण्यात पडल्याचे कळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी पाण्यात उडी मारत तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा आणि खुशी खोल पाण्यात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर कावेरीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.

कावेरी हिस पुढील उपचारासाठी तत्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले. एकमेकींना वाचविण्यात या तिघी पाण्यात पडल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version