गोल पोस्ट महाराष्ट्र जालना राजुर रोडवर मोटारसायल आणि आयशर टेम्पोचा आपघात, दोन जण गंभीर जखमी

जालना राजुर रोडवर मोटारसायल आणि आयशर टेम्पोचा आपघात, दोन जण गंभीर जखमी

जालना ३ जानेवारी २०२४ : जालना-राजुर रोडवर मोटारसायकल आणि आयशर गाडीचा अपघात झाल्याची घटना आज रोजी घडली. सतीश खंडाळे आणि शंकर खंडाळे (रा. घानेवाडी, तालुका जालना) असे अपघातात जखमी झाल्याची नावे आहेत. दोन्ही युवक घाणेवाडी येथुन जालन्याकडे जात असताना जालना राजुर रोडवर गौरी कंपनीच्या समोर आयशर आणि मोटरसायकलची धडक होऊन अपघात झालाय.

या अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी झालेत. त्यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत घटनेची माहिती पोलिसांना दिली. चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असुन आयशर गाडी ताब्यात घेऊन चंदनझिरा पोलीस ठाण्यात लावण्यात आली. पुढील तपास चंदनझिरा पोलीस करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version