गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यातून पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

पुण्यातून पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

पुणे, १९ जुलै २०२३ : राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या आणि सुफा या आंतकवादी टोळीशी संबंधित असलेल्या दोघांना, पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

राजस्थानमधील एनआएच्या एका गुन्ह्यांत हे आरोपी फरार होते. त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस देखल ठेवण्यात आले होते. इम्रान खान आणि युनूस साकी अशी दोघांची नावे आहेत. मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास कोथरूड पोलीस पेट्रोलिंग पथकातील प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना पकडले होते.

जेव्हा त्यांना घराच्या झडतीसाठी नेले, तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांना पकडले. त्यानंतरच्या घराच्या झडतीत एक जिवंत राऊंड आणि ४ मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. गेल्या दिडवर्षापासून ते पुण्यात वास्तव्याला असल्याचे तपासात समोर आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version